BIG NEWS : थायलंडमध्ये बाल संगोपन केंद्रात थरार : माथेफिरूने बेछूट गोळीबार करून 22 मुलांसह 31 जणांची केली हत्या ; पत्नी आणि मुलालाही केले ठार

439 0

थायलंड : थायलंड मधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे एका माथे फिरू नये बालसंगोपन केंद्रामध्ये बेछूट गोळीबार करून 22 लहान मुले आणि 31 जणांची हत्या केली आहे यामध्ये त्यांनी पत्नी आणि मुलाला देखील ठार केले आहे त्यानंतर स्वतःवर देखील त्याने गोळी झाडून घेतली असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार पन्या कामराब (वय ३४) असं या हल्लेखोराचं नाव आहे. विशेष म्हणजे हा हल्लेखोर पोलीस दलात काम करत होता. हल्लेखोरास मादक पदार्थांच्या तस्करीमध्ये हात असल्याच्या ठपका ठेवून त्याची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आली होती.

त्याने असे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाही तथापि या दुर्दैवी घटनेमध्ये 22 मुलांसह 31 जणांचा मात्र अंत झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!