#LOCKDOWN : भारतीयांच्या आयुष्यातील त्या काळ्या आठवणींना तीन वर्षे पूर्ण; आजच्याच दिवशी पंतप्रधानांनी लॉकडाऊनची केली होती घोषणा

677 0

भारत : 2020 मध्ये भारतात कोरोना अक्षरशः तांडव केला होता. अर्थात जगभरातील इतर देशांची ही काही वेगळी परिस्थिती नव्हती. तेव्हा भारतापेक्षा कित्येक पटीनं जास्त हाहाकार हा जगभरात माजला होता. पंतप्रधानांनी कोरोनाला थोपवण्यासाठी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. 24 मार्च रोजी संध्याकाळी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा अचानक पंतप्रधानांनी केली आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी 26 डिसेंबर 2019 रोजी वूहान शहरांमध्ये कोरोना विषाणू आढळल्याची माहिती दिली होती. 29 जानेवारी 2020 ला भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला. तर 11 मार्च 2020 रोजी कोरोना विषाणूचा उद्रेक हा जागतिक महामारी असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात सर्वात पहिला रुग्ण हा पुण्यामध्ये 9 मार्च 2020 रोजी आढळून आला होता.

भारतातील एकंदरीत परिस्थिती पाहता मार्चमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 500 वर पोहोचली. त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या घटनेला आज तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. प्रत्येक भारतीयाच्या आयुष्यातील हा एक वाईट आठवणीतला काळच राहील.

Share This News
error: Content is protected !!