पुणे : ताम्हिणी घाटात पर्यटकांची कार दरीत कोसळून तिघांचा मृत्यू ; अन्य तिघांना वाचवण्यात यश… पाहा VIDEO

889 0

पुणे : पुण्यातील ताम्हिणी घाटात पर्यटकांची कार दरीत कोसळून तिघांचा मृ्त्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या कारमध्ये एकूण सहा तरुण होते, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला तर इतर तीन जणांना वाचवण्यात यश आलं. हे सर्व तरुण विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी आले होते.

अधिक वाचा : Deputy CM Manish Sisodia : उपमुख्यमंत्र्यांसह 13 जणांविरोधात लुकाऊट नोटीस जरी ; देश सोडण्यास मनाई

https://youtu.be/lkhuW3-FOkc

या दुर्घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विदर्भातील वाशिम जिल्ह्यातून सहा तरूण पर्यटक फिरण्यासाठी ताम्हिणी घाटात आले होते. घाटातील रस्त्याचा अंदाज न आल्यानं त्यांची कार दरीत कोसळली. त्यात ऋषभ चव्हाण, सौरभ हिंगे आणि कृष्णा राठोड या तिघांचा मृत्यू झाला तर रोहन गाडे, प्रवीण सरकटे आणि रोशन चव्हाण हे तीन जण जखमी झाले. ताम्हिणी घाटात कार अपघात झाल्याची माहिती मिळताच रायगड पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झालं आणि तातडीनं मदत व बचावकार्यास सुरवात केली. कारमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला झाल्याचं आढळून आलं. जखमी झालेल्या तीन जणांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अधिक वाचा : अरर…! विचित्र अपघात , पहिल्या अपघातातून वाचला आणि लगेचच दुसरा अपघात , व्हिडिओ व्हायरल

Share This News
error: Content is protected !!