“ज्यांना रताळे आणि बटाटे याचा फरक कळत नाही त्यांनी पायरी सांभाळून वागावे…!” प्रदेशाध्यक्ष बदलाच्या मागणीवरून आशिष देशमुखांना रोहन सुरवसे पाटील यांनी फटकारलं

450 0

मुंबई : ज्यांना रताळे आणि बटाटे याचा फरक कळत नाही त्यांनी पायरी सांभाळून वागावे; प्रदेशाध्यक्ष बदलाच्या मागणीवरून आशिष देशमुखांना रोहन सुरवसे पाटील यांनी सुनावलं आहे.जनतेचे हित आणि जनतेचा विकास हा त्यांनी घेतलेला ध्यास आहे.ते पदासाठी राजकरणात नाहीत तर जनतेच्या विकासासाठी राजकरणात आहेत. याचे भान आशिष देशमुख यांना असावे. कारण ते भान हरपून वागत आहेत.

आजवर देशमुख यांनी वेगवेगळी स्टेटमेंट देत तोंडाची वाफ बाहेर काढली आहे आणि हा त्यांचा निव्वळ बिनभांडवली धंदा आहे.प्रकाश झोतात येण्यासाठी सतत चमकोगिरी करणे हे देशमुख यांचे नित्याचे बनले आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा राजीनामा असो,वेगळ्या विदर्भाची मागणी असो किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवने असो, आपल्याच पक्षातील नेत्यांचा राजीनामा मागणे अशा चमकोगिरी करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.

नाना पटोले यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र् काँग्रेस चांगल्या आणि योग्य प्रकारे काम करत आहे. त्यामुळे नाना पटोले यांचा राजीनामा मागण्यापॆक्षा आशिष देशमुख यांनी स्वतः पक्षातून बाहेर पडलं पाहिजे.कारण ते पक्षविरोधीच काम करत आहेत. या आधीही काँग्रेस पक्षाने केंद्रीय समितीने पाठवललेल्या उमेदवाराला विरोध करायचं काम त्यांनी केलं आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी इम्रान प्रतापगडी यांना उमेदवारी दिल्यांनतर त्यांनी पक्षाचा पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतरही ते पक्षात कसं काम करत आहेत. असा आमचा त्यांना सवाल आहे.

Share This News
error: Content is protected !!