संबंधांमध्ये अडथळा ठरत होती 3 वर्षांची चिमुकली; आईनेच काढला असा काटा, अंगावरच्या शालिनी पोलिसांनी असा काढला आरोपींचा मागोवा

1247 0

पुणे : संबंधित घटनाही पुण्यातील खडकी परिसरामध्ये एका तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर सुरू झाली. या मुलीच्या मृतदेहाच्या अंगावर असलेल्या शालीच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपींचा मागोवा काढला आहे.

सविस्तर माहितीनुसार, आरोपी महिला हिच लग्न झालेलं असून, पतीशी पटत नाही म्हणून ती तिच्या अकोल्यातील खिरपुरी या गावांमध्ये राहत होती. दरम्यान तिथेच तिचे संतोष नावाच्या एका व्यक्तीबरोबर प्रेम संबंध जोडले. काही महिन्यांपासून संतोष हा पुण्यात कामानिमित्त राहत होता. या महिलेने तिच्या गावातून पळ काढून एका मुलीला घेऊन पुण्यात आली होती.

या महिलेला तीन मुली आणि एक मुलगा आहे. यातील ही तीन वर्षाची मुलगी घेऊन ती पुण्यात आली होती. पुण्यातील दापोडी परिसरात राहत असताना रात्रीही मुलगी रडायची. याचाच या दोघांना त्रास होत होता. त्यामुळे जन्मदात्या आईने आपल्या प्रियकराची मदत घेऊन या तीन वर्षाच्या चिमुकलीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह खडकी परिसरात टाकून दिला होता.

दरम्यान पोलिसांनी या शालीवरून आरोपींचा मागोवा काढला. परिसरात असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक जोडपं या परिसरात येताना हीच शाल एका महिलेच्या अंगावर लपेटलेली दिसली. पण परत जाताना ती शाल दिसली नाही. यावरूनच माग काढून बातमीदारांच्या मार्फत मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन सापळा रचून या दोघा आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!