“…त्यांना टार्गेट करून निलंबन करण्यात आलं !” जयंत पाटील यांच्या निलंबनाबाबत अजित पवार यांची प्रतिक्रिया

291 0

नागपूर : हिवाळी अधिवेशनात जयंत पाटील यांचं निलंबन करण्यात आलं. या निलंबनाविरोधत विरोधक एकवटले. सरकार अन्याय करत असल्याची भावना आहे. यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ३२ वर्षांची जयंत पाटील यांची कारकिर्द आहे. आम्ही त्यांना जवळून बघतो. त्यांचा स्वभाव शांत, संयमी आहे. पण, त्यांना टार्गेट करून निलंबन करण्यात आलं. गेल्या काही दिवसांच्या कामकाजात निर्लज्जांसारखं का वागता तुम्ही. काही दिवसांची चर्चा होऊ द्या. विरोधकांनाही आपली बाजू मांडण्याचा संधी द्या. अशापद्धतीनं ते सांगत होते, असंही अजित पवार यांनी सांगितलं.

स्पीकर सत्ताधारी पक्षाला झुकत माप देतात. तरीही विरोधी पक्षाला त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी दिली पाहिजे. तो त्याचा हक्का, अधिकार आहे. आयुधांचा वापर करून बोललं जातं. सत्ताधारी आणि विरोधक दोघांचही म्हणणं पुढं आलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!