“त्यांनी मला वेगळ्या उद्देशाने स्पर्श केला…!” भाजपा महिला पदाधिकाऱ्याचा आरोप; जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात गुन्हा दाखल ; आव्हाड आमदारकीचा देणार राजीनामा ?

327 0

मुंबई : हर हर महादेव चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना 15000 रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देखील मंजूर करण्यात आला. परंतु आता पुन्हा एकदा त्यांच्यावर एक नवीन संकट ओढावल आहे. भाजप महिला पदाधिकाऱ्यांना जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

या महिला पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “माझ्या परवानगीशिवाय मला हात लावला, त्याची मी निंदा करते. मी पोलीस आणि गृहमंत्र्यांना विनंती करते जे माझ्याबरोबर झाले त्यानुसारच कलम लावा 354 कलम लावून मला न्याय देण्याची मागणी तुमच्याकडे करते असे त्या म्हणाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी या महिला पदाधिकारी गेल्या होत्या. या वेळीची दृश्य देखील एका कॅमेरा मध्ये कैद झाली आहेत. मी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी म्हणून पुढे गेले तर आमदारांना अडचण झाली. आमदारांना जायला वाट नव्हती त्यांनी मला गच्च धरून बाजूला करून फेकून दिल. मला ढकल. अशा शब्दात त्यांनी आरोप केले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आता मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये कलम 354 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यानंतर मात्र जितेंद्र आव्हाड यांनी एक धक्कादायक निर्णय घेतलाय. जितेंद्र आव्हाड हे आता विधानसभेच्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. आपल्या ट्विटर अकाउंट वरून तयांनी हि धक्कादायक माहिती दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!