“12 डिसेंबरचे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही…!” रिक्षा संघटनांना राज ठाकरेंनी दिले आश्वासन, वाचा सविस्तर

944 0

पुणे : रिक्षा संघटनांनी सोमवारी पुण्यामध्ये मोठे आंदोलन उभे केले होते. बेकायदेशीर बाईक आणि टॅक्सीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी आता रिक्षा संघटनांनी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी 12 डिसेंबरचे आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे आश्वासन रिक्षा संघटनांना दिले आहे.

बघतोय रिक्षावाला संघटना अध्यक्ष केशव नाना क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि रिक्षा संघटनांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असल्याचे समजते. राज ठाकरे यांनी रिक्षा संघटनांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो तोडगा काढला जाईल आणि 12 डिसेंबरचे आंदोलन होण्याची वेळ येणार नाही असे आश्वासन रिक्षा संघटनांना दिले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!