पुणे तिथे गुन्हेगारही नाहीत उणे ! जेएम रोडवर महिलेवर कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी देणारे चौघं गजाआड; दोन आरोपी अल्पवयीन !

715 0

पुणे : पुण्यात सध्या गुन्हेगारीनं चांगलंच डोकं वर काढले. सर्रास रहदारीच्या रस्त्यांवर कोयते हॉकी स्टिक घेऊन, गुन्हेगार दहशत माजवण्याचा प्रयत्न करतच आहेत. पोलीस प्रशासन ही गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न जरी करत असले, तरी एकंदरीत गुन्हेगारांचे प्रमाण आणि वय हा देखील विचार करण्याचा मुद्दा ठरतोय.

गुरुवारी जे एम रोडवर अशीच एक घटना घडली. जे एम रोडवर गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या महिलेवर कोयता उगारून त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण करण्याचा एका टोळक्याने प्रयत्न केला होता. या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय खरं , पण यामध्ये दोन गुन्हेगार हे अल्पवयीन आहेत. त्यामुळे गुन्हेगारीचा वय देखील आता कमी होतंय.

दरम्यान या घटनेतील या चौघा आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आणि कौशल्याने तपास करून ताब्यात घेतलय. यामध्ये रणजीत रघुनाथ रामगुडे (वय वर्ष 20), रोहन गोरख सरक (वय वर्ष 19), विशाल शंकर सिंह (वय वर्ष 18) आणि आदित्य राजे वडस्कर (वय वर्ष 19) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!