” महिलेने उत्तेजित करणारे कपडे घातले होते…!” केरळ मधील कोर्टाने नोंदवलेले निरीक्षण चर्चेत , वाचा सविस्तर प्रकरण …

468 0

केरळ : हे प्रकरण आहे केरळमधील कोझिकोड सत्र न्यायालयातील एका लैगिक छळ आरोपीच्या जमीन अर्ज सुनावणी दरम्यानचे … सिविक चंद्रन हे केरळमधील एक ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत . वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांच्यावर एका महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. या प्रकरणी सिविक चंद्रन यांनी जामीन अर्ज केला असता या याचिकेवर सुनावणी दरम्यान कुझीकूड सत्र न्यायालयाने नोंदवलेल निरीक्षण सध्या चर्चेचा विषय बनते आहे .

354 अ कलमाखाली पीडित महिलेने सिविक चंद्रन यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता . याप्रकरणी पुरावे तपासल्यानंतर महिलेने उत्तेजित करणारे कपडे घातले होते हे स्पष्ट दिसत असून लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करता येणार नाही. असे स्पष्ट मत कोर्टाने दिल आहे .

याप्रकरणी सिविक चंद्रन यांच्या वतीने पुराव्या दाखल काही फोटो सादर करण्यात आले होते. यामध्ये या महिलेचे कपडे उत्तेजित करणारे होते हे दिसून येते आहे. त्यामुळे आरोपीवर 354 अ कलम लागू करता येणार नाही ,असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले .

तसेच 74 वर्षीय आरोपी शारीरिकदृष्ट्या कमजोर असून जबरदस्तीने पिडीतेला मांडीवर बसवणं ही अशक्य गोष्ट आहे . त्यामुळे यावर विश्वास ठेवता येणार नाही . असे सांगून जामीन अर्जावर सुनावणी करताना या प्रकरणातील सिविक चंद्रन यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!