पुण्यातील तरुणाची अनोखी शिवभक्ती ! तब्बल 22 हजार 301 नाण्यांपासून बनवले शिवलिंग, गिनीज बुक मध्ये नोंद

1192 0

पुणे : पुण्यातील एका शिवभक्त तरुणांन अनोखी शक्कल लढवली आहे. आजपर्यंत अनेक वस्तूंपासून बनवलेले शिवलिंग तुम्ही पाहिले असेल, ऐकले असेल. या तरुणाने तब्बल 22 हजार 301 नाण्यांचा वापर करून शिवलिंग साकारले आहे. या शिवभक्त तरुणांचे नाव आहे दीपक घोलप…! दीपक यांनी दावा केला आहे की जगातील हे अशा प्रकारचे पहिलेच शिवलिंग आहे.

दीपक घोलप यांनी दोन, पाच, आणि दहा रुपयांची 22 हजार 301 नाणी वापरून हे शिवलिंग साकारले आहे. हे शिवलिंग बनवण्यासाठी दीपक घोलप यांना चार महिने लागले असून दोन रुपयांची 14,916 , पाच रुपयांची 4872 , आणि 10 रुपयांची 510 रुपयांची नाणी त्यांनी वापरली आहे. अशी एकूण 79 हजार 3001 रुपयांच्या नाण्यांपासून हे शिवलिंग साकारण्यात आले आहे. या शिवलिंगाची आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नोंद करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!