अहमदनगर : विद्यार्थ्यांची पायपीट होणार बंद ; लायन्स क्लब पुणे व लायन्स क्लब तळेगावतर्फे विदयार्थ्यांना ७५ सायकलींचं वाटप (VIDEO)

486 0

अहमदनगर , (अकोले) : अकोले तालुक्यात 6 किलोमीटर पायपीट करून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदिरातील 75 विद्यार्थ्यांना या सायकली देण्यात आल्या आहेत .

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा आदिवासी बहुल मानला जातो.डोंगरी भागामुळे येथे अनेक ठिकणी बसेस अथवा वाहतुकीची साधने कमी आहेत.विद्यार्थ्यांना याचा सर्वात मोठा त्रास सहन करावा लागतो. अनेक किलोमीटर पायपीट करून विद्यार्थी शाळेत पोचतात. विद्यार्थ्यांची ही अडचण ओळखून त्यांच्या मदतीसाठी लायन्स क्लब पुणे व लायन्स क्लब तळेगाव समोर आले.

त्यांनी अकोले तालुक्यातील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय खिरविरेमधील विद्यार्थ्यांना 75 सायकली वितरित केल्या. सायकलीमुळे विद्यार्थ्यांची पायपीट बंद होऊन शाळेत वेळेत पोचणे आता शक्य होणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!