उस्मानाबाद : काही दिवसांपूर्वी वर्दीमध्ये असताना ऑन ड्युटी रिल्स केल्याच्या कारणावरून राज्य परिवहन विभागामध्ये वाहक म्हणून कार्यरत असणाऱ्या मंगल गिरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मंगल गिरी यांचे सोशल मीडियावर असंख्य फॅन्स आहेत. तसेच राजकीय वर्तुळातून देखील रोहित पवार अजित पवार यांनी देखील ट्विट करून त्यांच्या निलंबनाबाबत नाराजी व्यक्त केली होती.आता राज्य परिवहन विभागाने मंगल गिरी यांचे निलंबन अखेर रद्द केले आहे.
अधिक वाचा : महिला ST कंडक्टरचे गणवेशातील रिल्समुळे निलंबन योग्य की अयोग्य ?
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारात मंगल गिरी या कार्यरत होत्या. दरम्यान त्यांच्याच सोबत वाहतूक नियंत्रक कल्याण आत्माराम कुंभार यांचे देखील विलंबन करण्यात आलं होतं, ते देखील रद्द करण्यात आले आहे. यावर माझ्यावर झालेली कारवाई ही चुकीची असून इतरांवर देखील तशी कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंगलगिरी यांनी दिली होती.
मंगलगिरी यांचे निलंबन मागे जरी घेण्यात आले असले, तरीही यापुढे व्हिडिओ बनवत असताना नियमांचं पालन करावं असे निर्देश देखील या पत्रकामध्ये देण्यात आले आहेत.