धुरळाच…! मुंबईत नुकत्याच विकल्या गेलेल्या या फ्लॅटची किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल; असं काय आहे या फ्लॅटमध्ये, वाचा

712 0

मुंबई : मुंबईमध्ये घरांच्या किमती या कोटिंमध्येच सुरू होतात. पण नुकत्याच विकल्या गेलेल्या या घराची किंमत ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल कारण एवढ्या किमतीमध्ये सामान्य माणसाची 200 तरी घर होतील.

तर मुंबईतील लोढा टॉवर मधील हा फ्लॅट तब्बल 252 कोटी रुपयांना विकला गेला आहे. हा फ्लॅट खरेदी केला आहे, मुंबईतील वाळकेश्वर येथील उद्योगपती नीरज बजाज यांनी तर हा फ्लॅट विकला आहे मायक्रोटेक डेव्हलपर्स लोढा ग्रुप यांनी… या दोघांमध्ये झालेला हा भारतातील सर्वात महागडा व्यवहार आहे.

29 व्या मजल्यावर असणारा हा फ्लॅट सर्वाधिक मोठा असून त्याचा कार्पेट एरिया 61 चौरस फूट इतका आहे. तर रेराच्या नियमावलीनुसार एकूण कार्पेट एरिया 12624 चौरस फूट असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर या फ्लॅटला 1441 चौरस फुटांची गॅलरी आहे.

2026 मध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होणार आहे. हा ट्रिपक्स फ्लॅट तब्बल 252 कोटी रुपयांना विकला गेला आहे.

Share This News
error: Content is protected !!