अपघातांची मालिका थांबेना; नवले ब्रिजवर भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

525 0

पुणे : नवलेपुलाची ओळख आता अपघातांचा पूल अशीच राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. रविवारी रात्री एका टँकरने तब्बल 48 वाहनांना ठोकरले. यामध्ये सात ते आठ नागरिक जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर तेथील परिस्थिती नियंत्रणात येते तोच पुन्हा सोमवारी पहाटे बाह्यवळण रस्त्यावर स्वामीनारायण मंदिराजवळ एका टेम्पोने सात वाहनांना ठोकरले आहे.

आता आणखीन एक अपघात सोमवारी नवले ब्रिजवर झाला आहे. हा अपघात एवढा भीषण असल्याचे समजते की, यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता ही अपघातांची मालिका केव्हा थांबणार असाच प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील रविवारी झालेल्या भीषण अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा अंदाज घेतला आहे.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide