#CRIME NEWS : पत्नीचे सासऱ्यासोबत होते तसले संबंध ; संतापलेल्या पतीने वडिलांनाच डोक्यात दगड घालून संपवले, असा झाला खुनाचा उलगडा

1202 0

मिर्जापुर : मिर्जापुरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पत्नीचे सासऱ्यांसोबतच अनैतिक संबंध होते. या गोष्टीवरून घरामध्ये रोज वादंग होत होती. या वादंगाने एक दिवस रुद्ररूप धारण केले आणि मुलानेच शेवटी वडिलांच्या डोक्यात दगडाने घाव घालून त्यांची हत्या केली आहे.

त्यानंतर मिर्जापुर मधील फुलारी या जंगलामध्ये वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपी मुलासह त्याचा भाऊ आणि गावातील एका व्यक्तीने मदत केली असल्याचं आरोपीने मान्य केलं.

मृतदेह मिळाल्यानंतर पोलीस तपास सुरू असताना कसून चौकशी केल्यानंतर मुलान हा गुन्हा आपणच केला असल्याच मान्य केलं. त्यावेळी त्यानी धक्कादायक खुलासा केला की, त्याची पत्नी आणि त्याचे वडील या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. ही गोष्ट घरामध्ये सर्वांना माहीत झाली होती. त्यामुळे घरात रोजच भांडण होत होतं. त्यामुळे एक दिवस संतापामध्ये वडिलांच्या डोक्यात दगडाने घाव घालून त्यांची हत्या केली आणि त्यानंतर भाऊ आणि एका गावातील व्यक्तीच्या मदतीने जंगलामध्ये वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली असे आरोपीने कबूल केल आहे.

याप्रकरणी प्रमुख आरोपी संजय कुमार, भाऊ बुद्ध सेन आणि सह आरोपी असलेला गावातील व्यक्ती फुलचंद धरीकार या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतल असून ज्या दगडाने त्यांची हत्या करण्यात आली तो दगड देखील जप्त करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!