लाल परीची दिवाळी जोरदार ! 275 कोटींचे उत्पन्न
महाराष्ट्र : कोरोना काळामध्ये सर्वच क्षेत्रांना जबरदस्त आर्थिक फटका बसला होता. लॉकडाऊनमुळे लाल परीला देखील याचा मोठा फटका बसला. पण आता ही सर्व कसर यंदाच्या दिवाळीने भरून काढली आहे. दिवाळीच्या काळात लाल परीने तब्बल 275 कोटींचे उत्पन्न मिळवले आहे.
दिवाळी हंगामात एसटीचे तिकीट दहा टक्क्यांनी वाढवण्यात येत असते. विशेष म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी एसटीने 56 लाख किलोमीटरचा प्रवास करून 31 कोटी रुपयांचे उत्पन्न अवघ्या एका दिवसात कमवले आहे. तर दिवाळीसाठी अधिक गाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे 21 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत अकरा दिवसात चार कोटी 95 लाख प्रवाशांद्वारे तब्बल 275 कोटींचे उत्पन्न लाल परीला मिळाले आहे. तर 80 लाख ज्येष्ठांनी मोफत प्रवास देखील केला आहे.
