“कैदी हे माणूस आहे त्यांना जनावरासारखी वागणूक देऊ नका !”, कैद्यांचे नातेवाईक आक्रमक; पुण्यातील येरवडा कारागृहाबाहेरील आंदोलन 

1251 0

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृह बाहेर आज येरवडा कारागृहातील कैद्यांच्या नातेवाईकांनी आंदोलन केल आहे. कारागृहातील कैद्यांना जनावरासारखी वागणूक देऊ नका, ते देखील माणूस आहे. असे फलक या नातेवाईकांनी घेतले होते. कारागृहांमध्ये चांगल्या प्रतीचे जेवण आणि औषध उपचार मिळत नसल्याकारणाने आज संतप्त नातेवाईकांनी कारागृहाबाहेर हे आंदोलन केला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी या नातेवाईकांसमवेत बैठक केली आहे. यावेळी पोलीस प्रशासनानं कायद्यांना चांगल्या प्रतीचे जेवण आणि औषध उपचार दिले जातात आणि यापुढेही दिले जातील असे आश्वासन दिले आहे.

Share This News
error: Content is protected !!