#FRAUD : ऐश्वर्या, दीपिका, आलिया, ह्रितिक अशा दिग्गज बॉलीवूड स्टार्सच्या नावाने क्रेडिट कार्ड बनवून बँकेला लाखोंचा चुना; 98 सेलिब्रिटींची नावे आली समोर; वाचा काय आहे प्रकरण…

806 0

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटींच्या नावानं फेक क्रेडिट कार्ड बनवून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये ऐश्वर्या रॉय ,दीपिका पदुकोण, आलिया भट, शिल्पा शेट्टी, सोनम कपूर यांच्यासारख्याच 98 सेलिब्रिटींची नावे देखील समाविष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही एक ५ जणांची टोळी आहे. या टोळीने या बॉलिवूड सेलिब्रिटी आणि काही फेमस क्रिकेटर्सच्या नावाने फेक क्रेडिट कार्ड तयार केले. यामध्ये आलिया भट, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या रॉय बच्चन, एम एस धोनी, अभिषेक बच्चन, सोनम कपूर, सचिन तेंडुलकर, सैफ अली खान, ह्रितिक रोशन ,शिल्पा शेट्टी या दिग्गज कलाकार आणि खेळाडूंचा समावेश आहे. या सेलिब्रिटींची गैरमार्गाने ओळखपत्र मिळवली. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर दस्तावेज तयार केले गेले. त्यानंतर या दस्तावेजांच्या मदतीने ही फसवणूक करण्यात आली आहे. या सेलिब्रिटींच्या नावाने विविध बँकांमधून कर्ज घेण्यात आल आहे. दोन वर्षापासून हे रॅकेट सुरू होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी सर्वात पहिली तक्रार ही पुण्यातून करण्यात आली. पुण्यातील मेसर्स एफ पी एल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी शेखावत यांनी सायबर सेलकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. एक कंपनी वर्चुअल कार्ड आणि क्रेडिट कार्ड तयार करते. सेलिब्रिटीचे बनावट पॅन कार्ड आणि आधार कार्ड तयार करून त्याद्वारे क्रेडिट कार्ड तयार केलं जातं. या कंपनीला या गँगन 21 लाख 31 हजार रुपयांचा चुना लावल्याचा आरोप या कंपनीने केला आहे.

या आरोपींना आता गजाआड करण्यात आल आहे. यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली असून, धक्कादायक म्हणजे या आरोपींकडून 25 पेक्षा अधिक आधार कार्ड, 40 क्रेडिट कार्ड, 10 मोबाईल, एक लॅपटॉप, 42 सिम कार्ड, 34 बनावट कार्डसहित पाच चेकबुक जप्त करण्यात आले आहेत. मागील दोन वर्षांमध्ये या गॅंग आतापर्यंत 90 लाख रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!