धक्कादायक : पूर्ववैमनस्यातून येरवड्यात दोन सराईत गुन्हेगारांचा खून; एक जण गंभीर जखमी

486 0

पुणे : पूर्ववैमनस्यातून येरवड्यामध्ये दोघा सराईत गुन्हेगारांचा तलवार आणि कोयत्याने वार करून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, येरवडा येथील पांडू लमाणवस्ती परिसरामध्ये शनिवारी पहाटे ही घटना घडली आहे.

या हल्ल्यामध्ये अनिल उर्फ पोपट वाल्हेकर आणि सुभाष उर्फ किसन राठोड या दोघांची हत्या करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याच वस्तीत राहणाऱ्या शंकर चव्हाण या व्यक्ती सोबत सुभाष राठोड याचे वाद होते. याच वादातून चव्हाण आणि त्याच्या साथीदारांनी अनिल वाल्हेकर, सुभाष राठोड यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये या दोघांचा मृत्यू झाला असून आणखीन एक साथीदार गंभीर जखमी झाला आहे.

Share This News
error: Content is protected !!