धक्कादायक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या मित्राचा खून; चाकूनं भोसकून दहाव्या मजल्यावरून खाली ढकललं, पतीला अटक VIDEO

798 0

भोसरी : पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्रानं भोसकून दहाव्या मजल्यावरील राहत्या घराच्या गॅलरीतून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेत निलेश अशोक जोर्वेकर या व्यक्तीचा मृत्यू झालाय.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी पंकज शिंदे याला त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. दोन दिवसांपूर्वी गावाला जातो, असं पत्नीला सांगत तो घराबाहेर पडला. याच दरम्यान पंकजच्या पत्नीला निलेश जोर्वेकर भेटायला आला. पंकज हा त्याच्या पत्नीवर पाळत ठेवून होता. तो एक दिवस अगोदरच गावावरून परतला तेव्हा निलेश जोर्वेकर आणि पंकजची पत्नी हे दोघेजण त्याच्या घरात गेले.

त्या पाठोपाठ काही मिनिटांत पंकज शिंदेही तिथं पोहोचला. त्यानंतर त्या दोघांमध्ये झालेल्या भांडणा दरम्यान पंकज शिंदे यानं निलेश जोर्वेकर याला धारदार शस्त्रानं भोसकलं. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत राहत्या घराच्या दहाव्या मजल्यावरील गॅलरीतून खाली ढकलून दिलं. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांनी पंकज शिंदे याला अटक केलीये.

Share This News
error: Content is protected !!