Maharashtra Politics : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; बैठकीतील विषय…

455 0

मुंबई : आज भाजप नेत्या मुंडे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये दोन्हीही भाजपच्या बड्या नेत्यांमध्ये सुमारे 40 मिनिटे चर्चा झाली आहे ही बैठक नक्की कोणत्या विषयावर पार पडली याचे कारण मात्र अद्याप देखील गुलदस्त्यातच आहे. 

गेली अनेक वर्ष पंकजा मुंडे या भाजपमध्ये डावलल्या जात आहेत पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळेल अशा आशा सर्वांना होत्या तथापि पुन्हा एकदा त्यांना डावळण्यात आलं कार्यकर्त्यांनी या गोष्टीचा संताप देखील व्यक्त केला पण पंकजा मुंडे यांनी त्यावेळी वातावरण शांत केलं

आता लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडणार आहे आणि त्यात पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट ही कदाचित याच विषयावर असावी असे कयास बांधले जात आहेत अद्याप तरी या चर्चेवर दोन्हीही नेत्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही

Share This News
error: Content is protected !!