लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे, त्यासाठी कालमर्यादा निश्चित व्हावी : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

715 0

मुंबई : विधान मंडळाच्या सभागृहात आलेले लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केले.

लोकपाल विधेयकाबाबत आज आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासण्यासाठी देण्यात येईल. ही समिती 19 सदस्यांची असेल. या समितीची नावे आजच निश्चित करण्यात येतील असे जाहीर केले.

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “इतर राज्यातील झालेले निर्णय तपासून मग यावर निर्णय घ्या. कालमर्यादा ठरवा. लोकपाल काय निकषांवर तयार झाले आहे हे तपासण्याची गरज आहे.”

“राज्यात खोट्या तक्रारीवर काय शिक्षा आहे याची जाणीव लोकांना आहे. माहिती अधिकार कायद्याच्या भीती दाखवण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. जमिनीचे गैरव्यवहार होत आहेत. रातोरात झाडे लावून मूल्यांकन वाढवण्याचे प्रकार होत आहेत,” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील,
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. दिलीप वळसे पाटील, आ. सचिन अहिर, आ.अभिजीत वंजारी, आ. विलास पोतनीस, आ. प्रवीण दरेकर, आ. एकनाथ खडसे, आ. जयंत पाटील,आ. कपिल पाटील, प्रधान सचिव नगर विकास आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे आदी उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide