मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अनेक मुद्द्यांमुळे वादंग निर्माण झाले आहेत. राहुल गांधी यांचे सावरकरांविषयी वक्तव्य त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले अवमानकारक वक्तव्य आणि त्यानंतर आता महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद असो… सातत्याने नवीन वाद पेटतच आहे.
आता महाराष्ट्र कर्नाटकसीमा वादाने बिकट रूप घेतले असतानाच संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजपनेते मंगल प्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून झालेल्या अपमान कारक वक्तव्यांबाबत देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरूनच माफी मागा अशी मागणी करत असताना आम्ही भडकावतोय असं म्हणतात हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा अवमान असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मी जर भडकावले असे जर ते पुन्हा म्हणत असतील तर पुन्हा एकदा ते महाराष्ट्राचा अपमान असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. तुमच्या मनात शिवाजी महाराजांच्या विषयी प्रेम आणि काय भावना हे दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुद्दा तापलेला असताना भाजपने छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुद्दा बाजूला करण्यासाठी कर्नाटक सीमा वादाचा विषय हाती घेतल्याचा गंभीर आरोप यावेळी खासदार संजय राऊत यांनी केला आहे.