कल्याणमधील ‘मी शिवसेना बोलतेय’ या देखाव्यास अखेर हिरवा कंदील ! काही अटी-शर्तींसह कोर्टाची परवानगी…

242 0

कल्याण : कल्याणमधील एका गणेश मंडळांनं साकारलेल्या ‘मी शिवसेना बोलतेय’ या वादग्रस्त देखाव्याला न्यायालयानं काही अटी-शर्तींसह सादर करण्यास परवानगी दिली. या वादग्रस्त देखावा सादर करण्यास पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती.

See the source image

कल्याणमधील विजय तरूण मित्र मंडळानं ‘मी शिवसेना बोलतेय’ असा एका वटवृक्षाचा देखावा साकारला होता. गणेशोत्सवाचं औचित्या साधून साकारण्यात आलेल्या या देखाव्यावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर विजय तरूण मित्र मंडळानं या कारवाईविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयानं काही अटी-शर्तींसह देखावा सादर करण्यास परवानगी दिली. कल्याण येथील ठाकरे गटातील पदाधिकारी विजय साळवी यांच्या विजय तरुण मंडळानं गेल्या तीन महिन्यांत शिवसेनेत ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर आधारित “पक्ष निष्ठा” या विषयावर चलचित्र देखावा साकारला आहे.

‘मी शिवसेना बोलतेय’ इथून या चलचित्र देखाव्याला सुरुवात होते. शिवसेनेला एक मोठा वृक्ष दाखवण्यात आलं असून या वृक्षाला फळं लागल्यानंतर ती इतर पक्ष खातात अशा प्रकारचा हा देखावा आहे. या देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेत कारवाई करत देखाव्याची सामुग्री जप्त केली होती.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide