“सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन ताकदीनिशी उभे राहणार !” विधानसभेत ठराव एकमताने मंजूर

324 0

नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये सुरू झाल्यानंतर विरोधकांकडून सातत्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद या प्रश्नावर ठराव आणण्याची मागणी होत होती. दरम्यान कर्नाटकातील मराठी भाषिक 865 गावांची इंचन इंच जागा महाराष्ट्राचीच असून सीमा भागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे निर्धाराने आणि सर्व ताकदीनिशी उभे असल्याचा ठराव आज विधानसभेत एका मताने मंजूर करण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या विधानसभेत अखेर महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न ठराव एकमताने मंजूर झाला. सोमवारी विधानसभेत विरोधकांनी सीमा प्रश्न सरकारकडून ठराव न झाल्याने मोठा गोंधळ केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमा प्रश्न ठराव सोमवारी अथवा मंगळवारी सादर होईल असे स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आज हा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे.

 

Share This News
error: Content is protected !!