वनविभागाचा मोर्चा वळाला विशाळगडावर; ऐतिहासिक विशाळगडावरील अतिक्रमणावर वनविभागाचा हातोडा

346 0

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्तित्वाची साक्ष देणारे अनेक ऐतिहासिक गडकिल्ले महाराष्ट्रात आजही खंबीरपणे उभे आहेत. महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वास्तूंवर मात्र अतिक्रमण आणि अस्वच्छतेच जाळ अनेक वेळा दिसून येत. मात्र आता महाराष्ट्र शासनाने मोठा कारवाईचा बडगा उभारत एक एक करून गड किल्ल्यांचा श्वास मोकळा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या वनविभागाचा मोर्चा वळाला आहे तो विशाळ गडाकडे…

विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास वनविभागानं सुरुवात केली आहे. यामध्ये पायथ्यावरील काही अतिक्रमणे काढण्यात आले आहेत. कच्ची अतिक्रमणे काढण्यात आली असून, पक्के बांधकाम करण्यात आलेली अतिक्रमणे येथे पंधरा दिवसात काढून घेण्यात यावीत अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

वनविभागाच्या मालकी असलेल्या जागेमध्ये वीस हून अधिक अतिक्रमणे आहेत. हे अतिक्रमणे काढण्यासंदर्भात येत्या सोमवारी मंत्रालयात बैठक होणार असून, या बैठकीमध्ये अतिक्रमण कोणत्या पद्धतीने काढण्यात यावे या संदर्भात चर्चा होणार आहे.

Share This News
error: Content is protected !!