पुणे – तुळशीबाग गणपती मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदा गणपती उत्सवामधे विविध विसर्जन घाटावर काम करणारे अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान तसेच जीवरक्षक आणि विषेश असे दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांचा कृतज्ञता गौरव म्हणून शहराचे पालकमंञी मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी सन्मान केला.
दलाचे प्रमुख देवेंद्र पोटफोडे यांनी यावर्षी प्रथमच विसर्जन घाटावर बंदोबस्तावर नियुक्त अधिकारी व जवान तसेच दलाचे नियंत्रण कक्ष यांचा एक वॉटसअप गृप तयार करत अतिशय उत्तमरित्या परिस्थितीवर नियंञण ठेवत विसर्जनावेळी कोणतीही दुर्घटना घडणार नाही आणि काही घडलेच तर तातडीने यावर उपाययोजना करणे सुलभ ठरेल अशा पद्धतीने सोशल मिडियाचा एक चांगला वापर त्यांनी केला आणि कुठे ही विसर्जनावेळी काही घडले नाही. तसेच मिरवणूकेच्या वेळी अग्निशमन वाहन व रेस्क्यु व्हॅन मदतीकरिता तैनात केल्या होत्या. त्याचकाळात नदीपाञात रस्यावर पडलेली दोन झाडे हलविण्यात याची मदत झाली.
मा. पालकमंञी यांनी अग्निशमन प्रमुख देवेंद्र पोटफोडे व त्यांच्या अधिकारी व जवानांचे कौतुक करताना ते म्हणाले की, “जसे आपल्या सैन्याचे जवान सीमेवर तैनात राहून आपल्याला सुरक्षित ठेवतात त्याचप्रमाणे अग्निशमन दल हे आपआपल्या शहरामधे अंतर्गत सुरक्षा करत आपल्याला सुरक्षित ठेवण्याचे काम अगदी चोख बजावत असते.”