मावळ : सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी; पतीने सांगितले वडिलांच्या मनाप्रमाणे वाग; सुनेने उचलले असे पाऊल…

1129 0

मावळ : मावळ मधून एक धक्कादायक घटना समोर येते आहे. पीडित महिलेचा पती रामदास भोजगे याचे विवाहबाह्य संबंध होते. त्याच्या डोक्यावर मोठे कर्जही होते. असं असताना सासऱ्यांनीच सुनेला ‘मला तुझे वेड लागले आहे. तुझ्या नवऱ्याला बाहेरचा नाद लागलाय. तो कर्ज फेडू शकत नाही. मी तुमचे कर्ज फेडतो. जमीनही नावावर करून देतो.’ असे म्हणून सुनेकडेच शरीरसुखाची मागणी केली. तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक देखील केली.

हा सगळा प्रकार पीडित महिलेने पतीला सांगितल्यानंतर पतीने देखील ‘वडिलांच्या मनाप्रमाणे वाग, त्यांना खुश कर ते आपलं कर्ज फेडणार आहेत. मला तुझ्यात रस राहिला नाही असे सांगितले. त्यानंतर या महिलेला मारहाण देखील केली.

पीडित महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन घडला प्रकार सांगितला. या महिलेच्या तक्रारीनुसार तळेगाव पोलिसांनी पती रामदास भोजगे वय वर्ष 34 आणि सासरे बबनराव भोजगे वय वर्ष 75 यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Share This News
error: Content is protected !!