जालना : जालन्यामध्ये आज मोठा अनर्थ होताना वाहन चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला आहे. तर झालं असं की, जालन्यात आज शेतकरी मेळावा भरला आहे . या शेतकरी मेळाव्यासाठी आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर देखील पोहोचले. श्री श्री रविशंकर येणार असल्याची माहिती परिसरात पसरली तशी त्यांचे दर्शन घेण्यासाठी श्रद्धाळूंनी एकच गर्दी केली होती.
दरम्यान मेळावा पार पडल्यानंतर श्री श्री रविशंकर कसे तरी गर्दीतून बाहेर पडले. परंतु त्यांचे दर्शन घेण्याचा हट्ट महिलांनी काही सोडला नाही. आणि थेट त्यांच्या वाहनाच्या समोर येऊन पडल्या अशी माहिती मिळते आहे. दरम्यान त्यांच्या वाहन चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच ब्रेक दाबला त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.