#VIRAL VIDEO : वाह ऋता ! दहा वर्षाच्या चिमुरडीचं धाडस; चोरट्याने ओरबाडली आजीच्या गळ्यातली सोन्याची साखळी, ऋताने चोराच्या थेट हाणल्या मुस्काटात

1112 0

पुणे : पुण्यामध्ये चेन्स स्नॅचिंगच्या घटना आज देखील सर्रास घडत आहेत. निर्जन रस्त्यावर एकट्या दुकट्या महिलांना हेरून हे भामटे महिलांच्या गळ्यातील चेन, मंगळसूत्र ओरबाडून दुचाकीवरून पळ काढतात. दरम्यान असाच एक प्रकार शिवाजीनगर परिसरात मॉडेल कॉलनी भागात घडला आहे. दुचाकीवरून एक चोरटा आला. रस्त्यावरून जाणा-या आजींना त्याने पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गुंतवले आणि क्षणार्धात त्यांची चेन ओढली.

आजींनी आरडाओरडा सुरू केला. तेवढ्यात त्यांच्या अवघ्या दहा वर्षाच्या नातीनं धाडस करून थेट त्या चोराला तोंडावर मारलं आहे. त्यानंतर या चोरट्याने पळ काढला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ देखील टळला आहे. कारण अशा घटनांमधून चेन ओरबडताना महिलांना अपघातांना देखील सामोरे जावे लागला आहे. या घटनेच सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर ऋताच सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

Share This News
error: Content is protected !!