विक्षिप्तपणाचा कळस : ‘त्या’ दिवसातल्या रक्तासाठी कुटुंबानेच उतरवले कपडे; सुनेचे अक्षरशः हाल; महिला दिनाच्या दिवशी दाखल झालेल्या या तक्रारीने महाराष्ट्र हादरला

1263 0

बीड : बीडमध्ये अक्षरशः संताप होईल अशी एक घटना घडली आहे. या विवाहितेने चार वर्ष अतोनात हाल सोसले. पती कमवत नाही म्हणून उपाशी राहावं लागलं, सासरकडच्यांकडून मानसिक, शारीरिक अत्याचार होत राहिले. आणि दिरानं मासिक पाळीतलं रक्त दे यासाठी कुटुंबीयांनी थेट विवस्त्र करून तिच्याकडे गलिच्छ अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर महिलेने माहेरी येऊन अखेर तक्रार दाखल केली आहे.

महिला दिनाच्या दिवशी दाखल झालेल्या या तक्रारीने अवघा महाराष्ट्र हादरला या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे बीड तालुक्यातील या मुलीचा विवाह 2019 साली झाला होता. तिचा सुरुवातीला घाटकोपर मधील एका मुलासोबत लग्न ठरलं होतं. परंतु गुरु आई म्हणून असलेल्या एका व्यक्तीने तिला केळवण्यासाठी बोलावलं. यामध्ये गुंगीचा औषध टाकून तिला बेशुद्ध केलं त्यानंतर तिला एका मुलाशेजारी झोपून त्यांचे आक्षेपार्ह असे व्हिडिओ शूट केले. हे व्हिडिओ घाटकोपर मधील त्या मुलाला पाठवल्यानंतर तिचा विवाह मोडला. याप्रकरणी पिडीतेने तक्रार दाखल केली होती. परंतु या गुरु आईने माफी मागून ज्या मुलासोबत हा व्हिडिओ शूट केला होता त्याच मुलासोबत तिचा विवाह लावून देण्याचं कबूल केलं.

त्यानंतर लग्न झाल्यावर या मुलीला आपल्या पतीचे या आधीही एक लग्न झाले ही गोष्ट समजली. याबाबत तिने जाब विचारला असता तिला धमकावण्यात आलं. तिने पुन्हा कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली परंतु पुन्हा एकदा या कुटुंबांन माफी मागून ते प्रकरण शांत केलं. हे प्रकरण मिटल्यानंतर पुन्हा ही पीडिता सासरी आली. परंतु त्यानंतर सासरकडच्यांनी तुझा नवरा काहीच कमवत नाही असं म्हणून तिला उपाशी ठेवून तिचा मानसिक शारीरिक अत्याचार करायला सुरुवात केली. दरम्यान तिच्या दिराने तिची मासिक पाळी सुरू असताना रक्त दे ! असं म्हणून तिला मारहाण केली. पिढीतेने नकार दिल्यानंतर संपूर्ण कुटुंबानं तिला एका खोलीत बांधून ठेवून आघोरी कृत्य केलं. अखेर हा अन्याय असाह्य होऊन पिडीतेने तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी तिने तिच्या पतीला देखील सांगितले. तिला विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याच देखील सांगितलं. पण पतीने मायबाप पुन्हा मिळणार नाही. पत्नी अनेक मिळतील असं विक्षिप्त वक्तव्य केल्याचं तिने म्हटलं आहे. याप्रकरणी आता तिचा पती सासरा दीर आणि इतर सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!