क्रूरतेचा कळस ! पत्नीला झोपेतून उठवत धावत्या ट्रेनखाली दिलं ढकलून ; अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ

1135 0

मुंबई : वसई रेल्वे स्टेशनवरून अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. वसई रेल्वे स्टेशनच्या 5 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून जे दृश्य रेकॉर्ड झालं ते पाहून तुमच्या हृदयाचा थरकाप उडेल.

माणसाच्या क्रूरतेचे उदाहरण वसईतील एका घटनेने समोर आलं आहे. सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास वसई रेल्वे स्थानकावर एक कुटुंब होतं. पत्नी आपल्या दोन मुलांसह स्टेशनवरील एका कठड्यावर झोपली होती. पती तिच्या जवळ आला आणि अचानक तिला उठवलं.झोपेतच त्याने तिला उभं केलं, आणि भरधाव वेगात येणाऱ्या एक्सप्रेस खाली ढकलून दिलं. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.पत्नीला ट्रेनखाली ढकलून दिल्यानंतर त्याने आपल्या दोन मुलांना घेतलं आणि तिथून घाईघाईत पसार झाला. त्याने केलेल्या या क्रूर कृत्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. वसई रेल्वे पोलिसांकडून या आरोपीचा शोध घेण्याचं काम सुरू आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!