पुणे : रिक्षावाला गाळतोय आपला घाम चक्काजाम चक्काजाम अशा आक्रोश आज सकाळपासूनच पुण्यात ऐकू येतोय. २० नोव्हेंबर पासून रिक्षा संघटनांचे सुरु असलेले आंदोलन अद्याप देखील आश्वासनांवरच डगमगते आहे. रिक्षा चालक असलेले मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभले असून देखील अद्यापही रिक्षा चालकाला मात्र न्याय मिळत नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्यावर होणाऱ्या अन्याय भूमिकेच्या विरोधात रिक्षाचालकांनी जोरदार आंदोलन उभे केले आहे. आज देखील सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे. बेकायदेशीर बाईक टॅक्सी कंपनीच्या विरोधात उभे केलेले हे आंदोलन अद्याप देखील निर्णयांती पोहोचले नाहीये त्यामुळे या परीक्षा चालकांचा संताप वाढतोच आहे.
रॅपिडो बाईक टॅक्सीचे अँप अद्याप देखील सुरूच आहे. 28 नोव्हेंबर रोजी पहिला संप पुकारण्यात आला होता, त्यानंतर अनेक आश्वासने मिळाली. आजचे आंदोलन होऊ नये यासाठी देखील पुणे अधिकारी यांनी आवाहन केले होते. पण आश्वासन आणि आवाहन यापलीकडे रिक्षा संघटनांना काहीच मिळत नाहीये. अद्याप देखील त्यांचे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत.