MAHARASHTRA POLITICS : धनुष्यबाण कोणाचा निर्णय नाहीच ! केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी दरम्यान आज काय घडले ? वाचा सविस्तर

1109 0

MAHARASHTRA POLITICS : धनुष्यबाण कुणाचा ? यावर आज महत्त्वाचा निर्णय होणार होता. परंतु केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेले ही सुनावणी आता 20 जानेवारी रोजी होणार आहे.

दरम्यान शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात महत्वपूर्ण सुनावणी पार पडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षाचा कार्यकाळ येत्या 23 जानेवारी रोजी संपत आहे. या साठीच पक्ष चिन्ह आणि पक्ष कुणाचा हा गुंता संपेपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. परंतु ही सुनावणी आता 20 जानेवारीला होणार आहे.

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केलेल्या युक्तिवादात ते म्हणाले कि , शिवसेनेतील फूट म्हणजे निव्वळ कल्पना आहे. त्यामुळे शिवसेनेतील फूट ग्राह्य धरू नये. ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिंदे गटाच्या याचिकेत अनेत त्रुटी असून, शिंदे गटाच्या बाहेर जाण्यामुळे पक्षाच्या स्थितीवर कोणताही परिणाम झाला नसून शिंदे गटाचे आमदार आणि खासदार ज्यांची संख्या त्या गटाकडून सांगितली जाते, ते सर्वजण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले आहेत, लोकांनी पक्षाच्या धोरणांना समोर ठेऊन मतदान केलं. त्यामुळे आमदार आणि खासदाराची संख्या ध्यानात घेऊ नये अशी विनंती कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाकडे केली.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide