” काँग्रेसला नकोसे झालेले सुरेश कलमाडी भाजपाला हवेहवेसे ! ” TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट

365 0

TOP NEWS मराठीचा स्पेशल रिपोर्ट : एकेकाळी सबसे बडा खिलाडी सुरेश कलमाडी अशी ओळख असलेले आणि पुणे शहरावर एक हाती वर्चस्व असलेले काँग्रेसचे माजी नेते सुरेश कलमाडी यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीपुर्वी भाजपशी जवळीक वाढविण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि कलमाडी यांची हातमिळवणी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्याला कारण ठरले आहे सुरेश कलमाडी यांचा पुणे फेस्टिव्हल….

पुण्याच्या राजकारणाचे अनअभिषिक्त सम्राट अशी ओळख असणाऱ्या सुरेश कलमाडींनी 1964 ते 1972 या काळात भारतीय वायू दलात पायलट म्हणून काम केलं. 1974 ला वायुदलातून निवृत्त घेतली अन 1977 ला इंडियन युथ काँग्रेसचे ते पुण्यातील अध्यक्ष झाले. पुढच्याच वर्षी त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशच्या युथ काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 1980 पर्यत ते युथ काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळत होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात मागे वळून कधी पाहिलेच नाही. पण कॉमनवेल्थ स्पर्धेतला घोटाळा 2011च्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आयोजनामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर करण्यात आला होता.

कारण ज्या कंपनीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या कंपनीचे डायरेक्टर सुरेश कलमाडी यांचा मुलगा होता. यासोबतच 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्येही भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावर केला जात आहे. हे प्रकरण प्रचंड गाजले, या प्रकरणाची चौकशी बसवण्यात आली. चौकशीअंती 25 एप्रिल 2011 ला सीबीआयने कलमाडी यांना अटक केली. त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यांना अटक झाल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे त्यांचं 6 वर्षांकरता सदस्यत्व रद्द करण्यात आलं. 26 एप्रिल 2011 ला त्यांना इतरही अनेक संघटनांच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले.

सुरेश कलमाडी त्यानंतर जवळपास नऊ महिने कारावासात होते. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला. पुढे कलमाडी कुठल्याच राजकीय कार्यक्रमात दिसले नाहीत. मात्र पुणे फेस्टिवलच्या माध्यमातून सुरेश कलमाडी हे सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत होते याच पुणे फेस्टिवलच्या 34 व्या उद्घाटन सोहळा शुक्रवारी केंद्रीय नितीन गडकरी ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ,राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मोठ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यामुळे पुणे शहरात कलमाडी भाजपाच्या माध्यमातून आपली सेकंड इनिंग सुरू करणार का अशा चर्चांना उधाण आलंय ?

अगदी काही दिवसांपूर्वीच पुणे महानगरपालिकेला भेट दिल्यानंतर कलमाडी पुन्हा एकदा चर्चेत आले होते आणि त्यानंतर आता दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत पुणे फेस्टिवलचे झालेलं उद्घाटन यातून काँग्रेसला नकोसे झालेले कलमाडी भाजपाला हवेहवेसे झालेत का असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झालेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!