मोठी बातमी : सत्यजित तांबेंच्या डोक्यावर काँग्रेस हायकमांडच्या कारवाईची टांगती तलवार ; नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरून राजकारण तापले

899 0

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरून चांगलेच राजकारण तापले आहे. ऐनवेळी डॉक्टर सुधीर तांबे यांची निवडणुकीतून माघार आणि त्यानंतर त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी भरलेला अपक्ष अर्ज यामुळे काँग्रेस हाय कमांड सत्यजित तांबे यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येते आहे.

डॉक्टर सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली आणि त्यानंतर त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला यामुळे नाना पटोले यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. आता काँग्रेस हाय कमांडने सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची मोठी बातमी समोर येते आहे.

यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, सत्यजित तांबे यांना हाय कमांडने निलंबित केले आहे. त्यामुळे मी यावर काही बोलू शकत नाही ! तर सत्यजित तांबे यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Share This News
error: Content is protected !!