मोठी बातमी : पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन

1033 0

पुणे : पुण्यातील कसबा विधानसभेच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे उपचारदरम्यान निधन झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून पुण्यातीलखासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

कसबा मतदार संघाच्या आमदार व माजी महापौर सौ.मुक्ता शैलेश टिळक यांचे आज दु.३.३० वा दुखःद निधन झाले. उद्या सकाळी अंत्यदर्शनसाठी ९.०० ते ११.०० केसरी वाडा राहत्याघरी ठेवण्यात येईल .अंत्यविधी वैकुंठ स्मशामभुमी येथे ११.००नंतर करण्यात येणार आहे .

मुक्ता टिळक या 2017 ते 2019 या काळात पुण्याचे महापौरपद भूषवले होते. मुक्ता टिळक या बाळ गंगाधर टिळक यांचे नातू जयंतराव टिळक यांच्या सूनबाई आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!