मोठी बातमी : जून 2024 पर्यंत जे पी नड्डाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

872 0

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकत्याच केलेल्या घोषणेनुसार, जून 2024 पर्यंत जे पी नड्डा हेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील हे स्पष्ट करण्यात आले आहे. जे पी नड्डा यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून, जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्या नंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष पद कुणाला मिळणार या विषयी तर्कवितर्क सुरू असतानाच आता हेच जून 2024 पर्यंत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!