मोठी बातमी : मोहसीन शेख हत्या प्रकरणातील हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई आणि 20 आरोपींची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर प्रकरण

745 0

पुणे : 2014 साली घडलेल्या मोहसीन शेख हत्या प्रकरणातील हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई आणि 20 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. 02 जून 2014 ला पुण्यातील हडपसर भागात मोहसीन शेख या आयटी इंजिनीयरची हत्या करण्यात आली होती. हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याच्यासह या संघटनेच्या 20 जणांवर मोहसीनच्या हत्येचा आरोप होता.

त्यावेळी फेसबुक आणि सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह्य पोस्ट टाकण्यात आल्यानं तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी धंनजय देसाईने त्याच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसमोर चिथावणीखोर भाषण दिल्याने त्याच्या कार्यकर्त्यांनी मोहसीनची हत्या केल्याचा आरोप होता.मोहसीन शेख हत्या प्रकरणातील हिंदु राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई आणि 20 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!