Breaking News

मोठी बातमी : सिक्कीममध्ये लष्कराची गाडी दरीत कोसळल्याची दुर्घटना; 16 जवान शहीद

505 0

सिक्कीम : सिक्कीमधून एक मोठी माहिती समोर येते आहे सिक्की मध्ये लष्कराची गाडी दरीत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे या दुर्घटनेमध्ये 16 जवान शहीद झाले असून चार जवान जखमी झाले आहेत.

या अपघाताबाबत लष्कराने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “उत्तर सिक्कीम मधील गेमा येथे 23 डिसेंबर रोजी लष्कराच्या ट्रकला अपघात झाला. या रस्ता अपघातात भारतीय लष्कराच्या 16 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातग्रस्त वाहन हे तीन वाहनांच्या ताब्याचा भाग होते. जे सकाळी चैत्तनहुन थांगुच्या दिशेने निघाले होते. झेमाच्या मार्गावर एका तीव्र वळणावर वाहन उतारावरून घसरले. तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली आणि चार जखमी सैनिकांना विमानाच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आल आहे.

यातील जखमींना उत्तर बंगालमधील लष्करी रुग्णालयात विमानाने हलवण्यात आल आहे. लष्कराचे वाहन 20 जणांसह सीमा चौकांकडे जात होते. गेमा परिसरातील एका वळणावर वाहन घसरले आणि हा ट्रक दरीत कोसळला.

Share This News
error: Content is protected !!