मोठी बातमी : रस्ता ओलांडताना प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांचा अपघात; डोक्याला जबर मार

555 0

अमरावती : प्रहार संघटनेचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांचा आज सकाळी रस्ता ओलांडताना मोठा अपघात झाला आहे. आज सकाळी रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीनं त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये बच्चू कडू यांना डोक्याला, पायाला आणि हाताला जबर मार लागला असल्याचे समजते आहे. दरम्यान बच्चू कडू यांना जवळच्या रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या चांगली असल्याचं समजत आहे.

आज भल्या सकाळी सहाच्या दरम्यान बच्चू कडू यांचा अपघात झाला. दुचाकी स्वाराने धडक दिल्यानंतर बच्चू कडू हे रोडच्या डिव्हायडर वर जाऊन आदळले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला असल्याचे समजते. डोक्यातून रक्तस्त्राव देखील झाला. परंतु तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्यांच्यावर योग्य उपचार करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती सध्या चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!