Breaking News

आर.एम.डी फाऊंडेशनद्वारा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी मंदिराचे केलेले सुशोभीकरण हि माऊलींवरची बालपणापासूनची श्रद्धा

351 0

आर.एम.डी फाऊंडेशनद्वारा संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी मंदिराचे केलेले सुशोभीकरण हि माऊलींवरची बालपणापासूनची श्रद्धाहजारों भाविकांच्या उपस्थितीत व टाळ्यांच्या गजरात भागवत सांप्रदायाचे प्रवर्तक योगी व महाराष्ट्रातील श्रद्धास्थान श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतोक्तर रौप्यमहोत्सव संजीवन समाधी सोहळा निमित्त आर एम डी फाऊंडेशनद्वारा निर्मित संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर सभामंडपाचे सुशोभीकरण उद्घाटन सोहळा आर एम डी फाऊंडेशनच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल बालन, उपाध्यक्षा शोभा आर धारीवाल यांच्या हस्ते नुकताच संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्मगावी आपेगांव येथे पार पडला.

उदघाटन प्रसंगी पुनीत बालन गृप व इंद्राणी बालन फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री पुनीत बालन उपस्थितीत होते.

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर प्रांगणातील किर्तन सभागृह त्यामधील संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांच्या जिवनावर आधारित प्रसंगाचे जसे की, वडील विठ्ठलपंत व आई रुख्मिनीमाता सह भावंडे, रेड्यामुखी वेद वदविला, चारही भावंडं आपेगांव वरून पैठणला
जातांना, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, भिंत चालविली, ज्ञानेश्वरी लिखाण, व संजीवन समाधी इत्यादी बाबतचा देखावा तसेच मंदिरातील खांबाचे नक्षीकाम व रंगरंगोटी ईत्यादी कामासाठी आर एम डी फॉउंडेशनद्वारा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता.

याप्रसंगी शोभा आर धारीवाल बोलत होत्या. तर मी कामानिमित्त देशभर फिरते त्यावेळी माझ्या पप्पांनी दिलेल्या देणग्या व त्यातून उभी राहिलेली कार्य अनपेक्षितपणे पाहायला मिळते व आपेगांव येथील कमान सुद्धा पप्पांनीच बांधून दिली होती अशी माहिती जान्हवी धारीवाल बालन यांनी दिली.

तसेच माऊलीला अर्पण होणारे हारं, फुलांच्या माळा, प्रसादाची पुडके, निर्माल्य हे परिसरात फेकून न देता त्याची योग्य विल्हेवाट लावा म्हणजे आपला परिसर स्वस्च्छ राहील असे आवाहनही
त्यांनी यावेळी केले.

तर मी माझ्या कामात व्यस्त जरी असलो तरी मला माउलीने येथे उपस्थित राहण्याचा संदेशच दिला अशी भावना श्री पुनीत बालन यांनी व्यक्त केली. यावेळी गावातील सरपंच, मंदिराचे विश्वस्त व हजारो भाविक उपस्थित होते.

Share This News
error: Content is protected !!