शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी आमदार अनिल भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला

483 0

पुणे : आमदार अनिल शिवाजीराव भोसले यांनी वैद्यकीय उपचारासाठी तात्पुरता जामीनाचा अर्ज केला होता. आज विशेष न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे. आमदार अनिल शिवाजीराव भोसले हे शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.

अनिल भोसले यांनी अर्ज केला होता की, किडनी आजाराचे उपचार ससून रुग्णालयात उपलब्ध नसून केवळ रुबी हॉल व पूर्ण हॉस्पिटलमध्येच उपलब्ध आहेत. यासाठी तात्पुरता जामीन अर्ज केला होता. तथापि नियमानुसार भोसले यांना सरकारी किंवा खाजगी रुग्णालयातच उपचार घेता येऊ शकतात. असा युक्तिवाद एडवोकेट विलास पठारे यांनी केला.

हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणातील भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले या देखील आरोपी असून त्या फरार आहेत. तसेच इतर १२ आरोपी देखील फरार आहेत.

Share This News
error: Content is protected !!