“12 आमदारांची दुसऱ्याच दिवशी नियुक्ती करणार होतो, पण त्या पत्रातील धमकीच्या भाषेमुळे मी सही केली नाही…!” ; तात्कालीन राज्यपाल कोश्यारी यांचा गौप्यस्फोट

532 0

मुंबई : विधान परिषदेच्या 78 सदस्यांपैकी बारा सदस्यांची नियुक्ती राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करत असतात. सध्या या बारा आमदारांच्या नियुक्ती संदर्भातील याचीकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. दरम्यान तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 12 आमदारांची नियुक्ती का केली ? नाही असा सवाल उपस्थित झाल्यानंतर कोश्यारी यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

यावेळी तात्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकारच्या डेलीगेशनने एक पत्र दिलं होतं. या पाच पानांच्या पत्रातून तुम्ही राज्यपालांना धमकी देताय ? राज्यपालांना सांगताय… हा कायदा… तो कायदा…. राज्यपालांना तुम्ही सांगताय की पंधरा दिवसात या नियुक्त्या करा ? मुख्यमंत्री राज्यपालांना हे सांगू शकतात असं कुठे लिहिलं आहे ? कुठल्या संविधानात ते लिहिले ? कुठल्या घटनेत तसं लिहिलंय ? असा प्रतिप्रश्न करून ते म्हणाले की, दुसऱ्याच दिवशी मी 12 आमदार नियुक्त्या करणार होतो. मात्र पत्रातील धमकीच्या भाषेमुळे मी सही केली नाही. असा गौप्यस्फोट भगतसिंह कोशारी यांनी केला आहे. तसेच हा सध्या हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. मी यावर जास्त बोलणार नाही, असं देखील कोश्यारी यांनी स्पष्ट केले आहे.

Share This News
error: Content is protected !!