Sapna Chaudhari

‘त्या’ व्हिडीओवरून सपना चौधरी ट्रोल; (Video)

502 0

मुंबई : हरियाणाची फेमस डान्सर सपना चाैधरी (Sapna Chaudhari) ही या ना त्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. सपना चाैधरी हिचे सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड चाहते आहेत. सपना चाैधरी हिच्या शोला प्रेक्षकांची उदंड अशी गर्दी ही बघायला मिळते. काही दिवसांपूर्वी बीड (Beed) जिल्हातील परळीमध्येही सपना चाैधरी हिच्या डान्सचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती.

सध्या सपना चौधरीचा या कार्यक्रमामधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ जुना आहे पण सध्या तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये सपना चाैधरी ही खुर्चीवर बसलेली दिसत आहे. यानंतर दोन चाहते हे सपना चाैधरी हिचे पाय पाण्याने धुतात. त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या या सपना चाैधरी हिच्या पायावर टाकल्या जातात. पुढे यामधील एक चाहता चक्क सपना चाैधरी हिचे पाय धुतलेले पाणी पितो.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर कमेंट करण्यास सुरूवात केली आहे. या व्हिडिओवरून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. एकाने लिहिले की, काय हा प्रकार आहे? दुसऱ्याने लिहिले की, ही सपना चाैधरी देव वगैरे आहे का? तिसऱ्याने लिहिले की, हा माणूस मला थोडा पागलच दिसत आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!