” ‘ती’ बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची..!” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

349 0

रायगड : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर एक बोट आढळून आली . सुरुवातीला ही बोट स्थानिक मच्छीमारांचीच असावी असे वाटत असताना , यामध्ये आढळून आलेला शस्त्रास्त्र साठा घातपाताचे संशय उपस्थित करत होता. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य पाहता स्थानिक प्रशासनाने तात्काळ मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त वाढवला . याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले.

या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये देखील एक निवेदन सादर केला आहे . यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की , ” बोटीशी संबंधित कागदपत्र मिळून आली आहेत. ही घटना निदर्शनास आल्यानंतर किनारपट्टीवर नाकाबंदीचे आदेश देण्यात आले असून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे . तर भारतीय कोस्ट गार्ड आणि इतर संबंधित यंत्रणांना ही कल्पना देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बोटीचे नाव लेडी हान असून ही बोट एका ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या हाना लाँडर्सगन या महिलेचे आहे.”

“26 जून 2022 ला या बोटीच इंजिन निकामी झालं होतं . त्यामुळे खलाशांनी मदतीसाठी कॉल केला त्याच दिवशी कोरियन युद्धनौकेन बोटीवरील खलाशांची सुटका केली . परंतु या बोटीचे टोइंग करता आले नाही . समुद्राच्या प्रवाहासोबत ही नाव हरिहरेश्वर किनाऱ्यालगत आली.  ही माहिती भारतीय कोस्ट गार्ड करून प्राप्त झाली आहे.”

” एकंदरीतच येऊ घातलेले मोठे सण-वार पाहता सुरक्षेच्या दृष्टीने सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास स्थानिक पोलीस आणि दहशतवाद विरोधी पथक करत आहे .”

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!