“माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणाऱ्यांना उत्तर द्यावे म्हणून ते बॅनर’…!” वसंत मोरेंनी व्हिडिओ ट्विट करून विरोधकांना दिले उत्तर

307 0

पुणे : काही दिवसांपासून मनसे नेते वसंत मोरे हे पक्षावर नाराज असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. अनेक वेळा ते दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार अशा अफवा देखील पसरवण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी वसंत मोरेंचे खांदे समर्थक असलेले निलेश माझिरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र म्हंटले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीने देखील त्यांना उघड ऑफर देखील दिली होती. वसंत मोरे यांनी पक्षातील अंतर्गत वादविवादांमुळे अनेक वेळा नाराजी व्यक्त केली पक्ष आणि पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याशी यांच्याशी फारकत घेणार नाही हे नेहमीच स्पष्ट केले.

काळ अमित ठाकरे यांच्याशि चर्चा झाल्यानंतर वसंत मोरेंची नाराजी कमी झाली आहे. आपल्या निर्णयावर ठाम असून अफवांना पूर्ण विराम देण्यासाठी वसंत मोरे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

“म्हटलं ते ऑफिसला लावून टाकावेत म्हणजे सर्वांना उत्तरे मिळतील. पुढे काय झाले ते तुम्हीच पहा …असे कॅप्शन त्यांनी दिले आहे.

Share This News
error: Content is protected !!