‘त्या’ बंदी घातलेल्या संघटनेने दिली भाजप नेत्याला जिवे मारण्याची धमकी

365 0

सोलापूर : सोलापूरचे माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांना PFI या संघटनेने जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली आहे.

PFI या संघटनेच्या नावाने ठार मारण्याची धमकी देणारे पत्र देशमुख यांना मिळाले. दरम्यान या पत्रामध्ये देशमुख यांना अपशब्द वापरून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उमेश कोळेकर यांनी रीतसर तक्रार दाखल केली आहे. गुन्हे शाखेच्या वतीने अधिक तपास सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!