धन्यवाद गुजरात! लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला! गुजरात विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट

242 0

गुजरात : गुजरातमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे मोठे यश मिळाले आहे. गुजरातमध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः मुख्यमंत्री असताना जेवढे यश मिळाले नव्हते तेवढे यश आज गुजरातमध्ये भाजपने मिळवल आहे. 182 जागांपैकी 154 जागांवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे.

या विजया नंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट केले आहे कि, “धन्यवाद गुजरात. अभूतपूर्व निवडणूक निकाल पाहून मी अनेक भावनांनी भारावून गेलो आहे. लोकांनी विकासाच्या राजकारणाला आशीर्वाद दिला आणि त्याच वेळी ही गती अधिक वेगाने चालू ठेवावी अशी इच्छा व्यक्त केली. गुजरातच्या जनशक्तीला मी नमन करतो.”

Share This News
error: Content is protected !!